वर्णद्वेषी धोरणाबद्दल र्होडेशिया (झिम्बाब्वे) ची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतुन हकालपट्टी करण्यात आली.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स द गॉल यांची हत्या करण्याचा कट फसला.
दुसरे महायुद्ध – सोविएत युनियनने रोमानिया जिंकले.
दुसरे महायुद्ध – ब्राझिलने जर्मनी व इटालीविरुद्ध युद्ध पुकारले.
कॅडिलॅक मोटर कंपनीची स्थापना
अमेरिकेने न्यू मेक्सिको हा प्रांत ताब्यात घेतला.
मॅट्स विलँडर – स्वीडीश टेनिस खेळाडू
चिरंजीवी – अभिनेते व केंद्रीय मंत्री
पंडित गोपीकृष्ण – कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते. भरतनाट्यम, कथकली, मणिपुरी आदी नृत्यप्रकारांतही त्यांनी नैपुण्य मिळवले होते. १९५७ मध्ये त्यांनी ८२ दिवसांत ८७ कार्यक्रम करुन विक्रम केला.
(मृत्यू:
१८ फेब्रुवारी १९९४)
डॉ. डेंटन कूली – हृदयरोपण शस्त्रक्रियेचा पाया घालणारे अमेरिकन शल्यविशारद
(मृत्यू: १८ नोव्हेंबर २०१६)
(Image Credit: Wikipedia)
गिरीजाकुमार माथूर – हिन्दी कवी
(मृत्यू: १० जानेवारी १९९४)
डॉ. बानू कोयाजी – कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणार्या सामाजिक कार्यकर्त्या. त्यांना पद्मभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, रामेश्वरदास बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कार, पुणे विद्यापीठातर्फे डॉक्टर
ऑफ लेटर्स (१९५५) इ. पुरस्कारांनी गौरविण्यात आले. पुण्यातील के. इ. एम. रुग्णालय, जहांगीर नर्सिंग होम, दैनिक सकाळ, इंडिया फांउंडेशन इ.संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता.
(मृत्यू: १५ जुलै २००४)
शंभू मित्रा – बंगाली रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक व नाटककार
(मृत्यू: १९ मे १९९७)
डेंग जियाओ पिंग – सुधारणावादी चिनी नेते
(मृत्यू: १९ फेब्रुवारी १९९७)
वामन तुकाराम तथा सूर्यकांत मांडरे – मराठी चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, पद्मश्री (१९७३). त्यांच्या ‘धाकटी पाती’ या आत्मचरित्राला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
(जन्म: ? ? ????)
पंडित रामप्रसाद शर्मा – संगीतकार, ट्रम्पेट व व्हायोलिनवादक. ‘लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या जोडीतील प्यारेलाल यांचे ते वडील होत.
(जन्म: ? ? ????)
पं. कृष्णराव शंकर पंडित – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक. राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी त्यांचा ‘राष्ट्रीय गायक’ म्हणून गौरव केला होता.
(जन्म: २६ जुलै १८९३)
एकनाथजी रामकृष्ण रानडे – क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक व कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार. अधिकाधिक लोकांचा सहभाग असावा म्हणून मोठमोठ्या देणग्या
जमा न करता एक एक रुपया जमा करुन त्यांनी विवेकानंद शिला स्मारकाचे प्रचंड काम उभे केले आहे.
(जन्म: १९ नोव्हेंबर १९१४)
चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक किशोर साहू यांचे बँकॉक विमानतळावर विमानात चढत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन
(जन्म: २२ नोव्हेंबर १९१५)
जोमो केन्याटा – केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
(कार्यकाल: १२ डिसेंबर १९६४ ते २२ ऑगस्ट १९७८)
(जन्म: २० आक्टोबर १८९३)
(Image Credit: Britannica)
वॉरन हेस्टिंग्ज – भारताचा पहिला गव्हर्नर जनरल
(जन्म: ६ डिसेंबर १७३२)
फिलिप (सहावा) – फ्रान्सचा राजा
(जन्म: ?? १२९३)