-: दिनविशेष :-

७ नोव्हेंबर


महत्त्वाच्या घटना:

२००१

बेल्जियमची राष्ट्रीय विमान वाहतुक कंपनी ‘सबीना’ दिवाळखोरीत गेली. १९१९ मध्ये स्थापन झालेल्या ‘स्नेटा’ नावाच्या विमानकंपनीचे राष्ट्रीयीकरण करून २३ मे १९२३ रोजी ही कंपनी सुरु झाली. १ एप्रिल १९२४ रोजी रोटरडॅम ते स्ट्रासबर्ग या फेरीने व्यावसायिक कामकाज सुरु झाले होते.

१९९०

मेरी रॉबिन्सन या आयर्लंडच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या.

१९५१

एम. पातंजली शास्त्री यांनी भारताचे २ रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
(कार्यकाल: ७ नोव्हेंबर १९५१ ते ३ जून १९५४)

१९३६

‘प्रभात’चा ‘संत तुकाराम’ हा चित्रपट पुण्यातील ‘प्रभात’ चित्रपटगृहात रिलीज झाला.

१९१७

पहिले महायुद्ध – गाझाच्या तिसर्‍या लढाईत ब्रिटिश फौजांनी गाझा ताब्यात घेतले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५४

कमल हासन – अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक

१९४५

यशवंत दत्तात्रय महाडिक ऊर्फ यशवंत दत्त – चित्रपट अभिनेते
(मृत्यू: ११ नोव्हेंबर १९९७)

१९१५

गोवर्धन धनराज पारिख – महाराष्ट्रातील विचारवंत व शिक्षणतज्ञ
(मृत्यू: ? ? ????)

१९००

प्रा. गोगिनेनी रंगा नायकुलू ऊर्फ ‘एन. जी. रंगा’ – स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, शेतकरी चळवळीतील नेते आणि काँग्रेसचे पुढारी
(मृत्यू: ९ जून १९९५)

१८८८

सर चंद्रशेखर वेंकट रमण – नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ
(मृत्यू: २१ नोव्हेंबर १९७०)

१८८४

डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे – क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि ‘गदर पार्टी’ चे शिल्पकार
(मृत्यू: २२ जानेवारी १९६७)

१८७९

लिऑन ट्रॉट्स्की – रशियन क्रांतिकारक
(मृत्यू: २१ ऑगस्ट १९४०)

१८६८

मोरो केशव दामले – व्याकरणकार व निबंधकार
(मृत्यू: ३० एप्रिल १९१३)

१८६७

मेरी क्यूरी – नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ
(मृत्यू: ४ जुलै १९३४)

१८५८

बंकिम चंद्र पाल – समाजसुधारक, स्वदेशी चळवळीचे शिल्पकार, विधवा पुनर्विवाहाचे समर्थक, जातिवर्णभेद विरोधक, ब्राम्हो समाजाचे सदस्य, लेखक, प्रभावी वक्ते, पत्रकार. गांधीजींचे असहकार आंदोलनाचे मवाळ धोरण त्यांना मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला व आयुष्याची शेवटची सहा वर्षे विजनवासात घालवली.
(मृत्यू: २० मे १९३२)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००९

सुनीता देशपांडे – लेखिका व स्वातंत्र्यसैनिक
(जन्म: ३ जुलै १९२६)

२०००

सी. सुब्रम्हण्यम – गांधीवादी नेते, केन्द्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल
(जन्म: ३० जानेवारी १९१०)

१९९८

पं. जितेंद्र अभिषेकी – शास्त्रीय गायक, संगीतकार व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक
(जन्म: २१ सप्टेंबर १९२९)

(Image Credit: sarangi.info)

पं. जितेंद्र अभिषेकी

१९८१

विल डुरांट – अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ
(जन्म: ५ नोव्हेंबर १८८५)

१९८०

स्टीव्ह मॅकक्‍वीन – हॉलिवूड अभिनेता
(जन्म: २४ मार्च १९३०)

१९०५

केशवसुत

कृष्णाजी केशव दामले तथा ‘केशवसुत ’ – मराठी काव्याचे प्रवर्तक. त्यांच्या सुमारे १३५ कविता आज उपलब्ध आहेत. त्यांच्या हयातीत त्यांची एकही कविता प्रसिद्ध झाली नाही. ‘केशवसुतांची कविता’ हा त्यांचा कवितासंग्रह त्यांच्या निधनानंतर ह. ना. आपटे यांनी प्रकाशित केला. त्यांच्या ‘तुतारी’, ‘नवा शिपाई’, ‘गोफण केली छान’ इ. कविता प्रसिद्ध आहेत.
(जन्म: ७ आक्टोबर १८६६)

(Image Credit: मराठी विश्वकोश)

१९६३

यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी – मराठी लघुकथाकार व ‘प्रसाद’ मासिकाचे संपादक. ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘शेवग्याच्या शेंगा’ या त्यांच्या कथांवर चित्रपट काढण्यात आले. ‘दुधाची घागर’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
(जन्म: १७ डिसेंबर १९०१)

१८६२

बहादूरशहा जफर – दिल्लीचा शेवटचा बादशहा
(जन्म: २४ आक्टोबर १७७५)Pageviews

This page was last modified on 06 October 2021 at 9:44pm